वृत्तसंस्था/ लॉसेनी
स्वित्झर्लंडचा फुटबॉलपटू झेद्रान शाकिरीला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती स्वीस फुटबॉल फेडरेशनने दिली आहे. शाकिरीने लिव्हरपूल संघाशी यापूर्वीच करार केला होता. आता लिव्हरपूलच्या अलकांटरा, सॅडिओ मॅनी यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असून या सर्वांना दोन आठवडय़ांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.
जून 2019 साली शाकिरीने पहिल्यांदा आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. कोरोनाची बाधा झाल्याने शाकिरीला क्रोएशियाबरोबर होणाऱया स्वीसच्या मित्रत्वाच्या सामन्यात खेळता येणार नाही. तसेच स्पेनमध्ये येत्या शनिवारपासून सुरू होणाऱया नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत तो खेळू शकणार नाही.









