वृत्तसंस्था / अबु धाबी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अबु धाबी महिलांच्या टेनिस स्पर्धेत इलिना स्विटोलिनाने एकेरीची तिसरी फेरी गाठताना रशियाच्या व्होनेरोव्हाचा पराभव केला. त्याचप्रमाणे कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात स्विटोलिनाने व्होनेरोव्हाचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे दुसऱया एका सामन्यात गॅसेनोव्हाने तृतीय मानांकित प्लिसकोव्हाचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. ब्रिटनच्या वॅटसनने तासभराच्या कालावधीत रशियाच्या व्हेट्रेव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित रिबेकिनाने चीनच्या झियुवर 6-4, 6-4 अशी मात करत पुढील फेरी गाठली.









