नवी दिल्ली
खाद्यपदार्थाच्या क्षेत्रात ऑर्डर स्वीकारणारी आणि पुरवठा करणारी कंपनी स्विगी येत्या काळात 350 जणांना पदावरून कमी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीची आर्थिक गणिते बिघडली असल्याने हा निर्णय कंपनीला घ्यावा लागतो आहे. दरम्यानच्या काळात मेपासूनच कंपनीने आपल्या कर्मचाऱयांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यास सुरूवात केली होती. त्याच महिन्यात 1 हजार 100 जणांना कंपनीने कमी केलं होतं. सध्याला कंपनीला व्यवसायात कोरोनामुळे मोठे नुकसान सोसावे लागत असून फक्त 50 टक्केच व्यवसाय वेग घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. खर्चाचे आणि एकंदरच आर्थिक गणित कोलमडले असल्याने कपात करण्यावाचून गत्यंतर उरलेले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.