ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवर ब्लॉग लिहिला. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वावलंबी भारत पॅकेजअंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षात राज्यांना अतिरिक्त कर्ज घेण्यास दिलेल्या परवानगीचे चांगले परिणाम दिसून आले. राज्यांना सुधारणा करण्यास प्रोत्साहित करणे हा या पॅकेजमागचा उद्देश होता. यामुळे त्यांना अतिरिक्त संसाधने जमवणे करणे शक्य झाले.
जेव्हा जगभरात आर्थिक संकट आले तेव्हा 2020-21 मध्ये भारतीय राज्यांना अतिरिक्त 1.06 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेता आले. मे 2020 मध्ये राज्यांना अतिरिक्त कर्ज म्हणून त्यांच्या जीडीपीच्या दोन टक्के एवढे पैसे घेण्याची परवानगी देण्यात आली होती. केंद्र आणि राज्यांमधील भागीदारीच्या वृत्तीमुळे संसाधनांच्या उपलब्धतेत ही वाढ शक्य झाली आहे.









