प्रतिनिधी / कडेगाव
कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उपाध्यपदी लालासाहेब यादव (कडेपूर) यांची निवड झाली आहे. लालासाहेब यादव हे गेल्या अनेक दशकापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी राजकारण व सहकारातील विविध पदावर प्रभावीपणे काम केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून यादव हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर नुकतीच त्यांची सर्वानुमते संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडीबद्दलत्यांचे पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचेसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
Previous Articleइस्लामपुरातील बनावट दस्त प्रकरणी दोघांना सक्तमजुरी
Next Article प्राथमिक शिक्षकांवर आता गुगल ऍपची करडी नजर








