ऑनलाईन टीम / लखनऊ :
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील बंडखोर मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या आठ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. धरमसिंग साईनी, भगवती सागर, विनय शाक्य, रोशनलाल वर्मा, मुकेश वर्मा, ब्रिजेशकुमार प्रजापती, चौधरी अमर सिंग अशी या सपामध्ये प्रवेश केलेल्या आमदारांची नावे आहेत. यासह अली युसूफ अली, माजी मंत्री रामहेत भारती यांच्यासह अनेक नेते सपामध्ये सामील होण्यासाठी दाखल झाले आहेत.
यावेळी सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, स्वामी प्रसाद मौर्य जिकडे फिरतात, त्या बाजूला सरकार स्थापन होते. भाजमध्ये सातत्याने विकेट पडत आहेत. निवडणुकीत 80 आणि 20 मध्ये लढत असल्याचे सांगितले जाते. 80 टक्के लोक आधीच सपासोबत आहेत आणि आज 20 टक्के लोक भाजपसोबत गेले आहेत. कदाचित स्वामी प्रसाद मौर्य आणि अन्य आमदार आमच्या बाजूने येणार आहेत हे सरकारला आधीच माहीत होते, म्हणूनच मुख्यमंत्री आधीच गोरखपूरला गेले.
स्वामी प्रसाद मौर्य एवढय़ा मोठय़ा संख्येने सपामध्ये दाखल होतील, असे कुणालाही वाटले नव्हते. आमची युती 400 जागाही जिंकू शकते, असेही अखिलेश यादव म्हणाले.