ऑनलाईन टीम / इलाहाबाद :
बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना इलाहाबाद हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शहाजहांपूर येथे चिन्मयानंद यांचे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. शाहजहांपुर जेलमध्ये स्वामी चिन्मयानंद बंदिस्त होते.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात बलात्काराचा आरोप करणाऱया तरुणीला अटक करण्यात आली होती. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला होता असून, त्यानंतर संबंधित तरुणी आणि तिच्या अन्य तीन सहकाऱयांवर गुन्हा दाखल केला होता.









