प्रतिनिधी/ सातारा :
पहाटेचा थंडगार वारा…. किल्ले अजिंक्यताऱयाला बांधलेले तोरण… ज्योत पेटवून धावणारे सातारकर, भगवे ध्वज-पताका अन् विविध वेशभुषा परिधान केलेले चिमुकले यामुळे राजसदरेवर जणू काही शिवकाल अवतरला होता. निमित्त होते, ‘सातारा स्वाभिमान दिवसा’चे… छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर 12 जानेवारीला झाला. तो दिवस स्वाभिमान दिवस म्हणून सातारकरांनी मोठय़ा दिमाखात साजरा केला. यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांना, माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो सातारकरांची भल्या पहाटे किल्ले अजिंक्यताऱयावर उपस्थिती होती. अवघ्या काही लोकांपर्यंत सुरू झालेला हा दिवस आता हजारोंच्या उपस्थितीत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
इतिहासात मराठय़ांनी जे अटकेपार झेंडे लावले. त्या मोहिमेचा आदेश साताऱयाच्या किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवरून देण्यात आला होता. किल्ले अज्ंिाक्यताऱयाला वेगळे महत्त्व अधोरेखित आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्यभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर दि. 12 जानेवारीला झाला. आणि त्याच दिवशी अजिंक्यतारा ही राजधानी बनली गेली. शाहू महाराजांनी सातारा शहर वसवले. त्यांच्या पराक्रमांना उजाळा मिळावा याकरीता साताऱयातल्या शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही स्वाभिमान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजसदरेवर इतिहासकार प्रा. के. एन. देसाई, इतिहास अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरूजी, इतिहासप्रेमी अजय जाधवराव, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नगरसेवक अविनाश कदम, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, अध्यक्ष दीपक प्रभावळकर, प्रशांत अहिराव, अविनाश पोळ, रवी पवार, नितेश भोसले, संदीपभाऊ शिंदे, जयश्री शेलार, डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अमरदादा जाधव, सुतगिरणीचे अध्यक्ष नावडकर, राम हदगे, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.









