स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसात झटापट, सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न; अटकाव करणाऱ्या पोलीस आणि कार्यकर्त्यांत धककाबुक्की
प्रतिनिधी / सांगली
सांगलीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसात झटापट झाली. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी अटकाव करणाऱ्या पोलीस आणि कार्यकर्त्यांत धककाबुक्की झाली. यावेळी शेट्टी यांनी सांगली पोलिसात पण सचिन वाझे असून, सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील आदेशाने पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला आहे. ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला, यावेळी आंदोलक आणि पोलिसात धुमचक्री झाली.
केंद्र आणि राज्यसरकार मधील लोक लुच्चे आहेत. केंद्र आणि राज्यसरकार मूळ प्रश्नावर चर्चा करण्या ऐवजी विषयांतर करण्यात रस आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सुद्धा, जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली आहे.एकमेकांवर चिखलफेक करून, सत्ताधारी आणि विरोधक जनतेच्या प्रश्ना पासून लक्ष विचलित करत आहेत, अशी टीका ही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.








