प्रतिनिधी / शिरोळ
कोणत्याही परिस्थितीत 19 ऊस परिषद होणारच राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी जो निर्णय घेतील तो शासन व कारखानदारांना मान्य करावाच लागेल त्यात तडजोड केली जाणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 19 ऊस परिषद होणार की नाही याची चर्चा होत होती या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणारच परतीचा पाऊस व कोरोना विषाणूमुळे नोव्हेंबरमध्ये ऊस परिषद घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगून ऊस परिषदेमध्ये जो निर्णय होईल तो शासनास व कारखानदारांना मान्य करावाच लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून अतिवृष्टीने काहीं भागातील शेतकऱ्यांचा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस परिषद होणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले
Previous Articleसातारा जिल्ह्यात 385 नागरिकांना दिला डिस्चार्ज
Next Article आयटीबीपीच्या 45 जवानांना कोरोनाची लागण









