फसवणुकीवर उभे असलेले नाते पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असते. स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. यामध्ये बऱयाचदा स्वातीला नन्ना सांगतो की श्रीधर काही चांगला माणूस वाटत नाही. श्रीधरच्या तोतया बायकोला भेटल्यावर देखील स्वाती श्रीधरचं खरं रूप ओळखू शकत नाही. स्वाती उघडय़ा डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये कारण,तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे. स्वातीसमोर स्वत:ला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डाव रचले. आणि त्यात स्वाती पूर्णत: अडकत चालली आहे. आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
श्रीधर आणि स्वातीच्या जुळू पाहणाऱया नात्यात अनेक संकट येत राहिली पण श्रीधरने प्रयत्न सोडला नाही. श्रीधरच्या प्रेमात जसजसे दिवस पुढे सरकू लागले स्वातीचा त्याच्यावरचा विश्वासदेखील वाढू लागला. श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा विचार देखील केला आहे. त्याने रचलेल्या या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली देखील जाणार आहे. आणि अखेर ती लग्नास होकार देखील देणार आहे. स्वाती आणि श्रीधरची अखेर रेशीमगाठ जुळणार आहे. आता हे कसे घडले ? श्रीधरने कसे स्वातीला यासाठी तयार केले ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. या दोघांच्या लग्नाला मिना आत्याचा पुर्णपणे विरोध आहे. त्यामुळे अचानक तिथे मिना आत्याच्या येण्याने काय होईल ? तिच्या येण्याने श्रीधर आणि स्वातीच्या नात्याला गालबोट तर लागणार नाही ना ? श्रीधरचा खरा चेहरा ती स्वातीसमोर आणू शकेल ? मिनाआत्या तिथे कशी पोहचली ? हे पूर्ण जाणून घेणे औत्स्gढक्याचे ठरणार आहे. चंद्र आहे साक्षीला ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.









