प्रतिनिधी /बेळगाव
स्वरमल्हार फाऊंडेशन बेळगाव आयोजित शास्त्रीय गायन बैठक दिवाळीनिमित्त दि. 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी पहाटे 6 वा. धारवाडच्या ऐश्वर्या यार्दी व नंतर बेळगावचे आकाश पंडित यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर अंगद देसाई व संवादिनीवर सारंग कुलकर्णी साथ देणार आहेत. हा कार्यक्रम अकॅडमी ऑफ म्युझिकच्या बुधवारपेठ येथील सभागृहात होणार असून, तो सर्वांना खुला आहे. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे-
ऐश्वर्या यार्दी
ऐश्वर्या या धारवाडच्या असून, संध्या कुलकर्णी व पं. कैवल्यकुमार गुरव यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. बीकॉम परीक्षेत कर्नाटक विद्यापीठाला त्यांनी प्रथम व एमकॉम परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला. गायनाची प्रथम परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या असून सध्या भारती विद्यापीठ पुणे येथे संगीताचे पुढील शिक्षण घेत आहेत. तसेच धारवाडच्या सीएसआय कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अतिथी प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत.
आकाश पंडित
आकाश यांचे प्राथमिक गायनाचे धडे अर्चना बेळगुंदी यांचेकडे झाले. रोहिणी कुलकर्णीं यांच्याकडून संवादिनीचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर श्रीधर कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन घेत आहेत. मार्केटिंग विषयातील एमबीए असलेले आकाश सध्या डॉ. गंगुबाई हनगल गुरुकुलमध्ये पंडित केदार बोडस यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. केंद्र सरकारच्या ज्युनिअर आणि सिनिअर शिष्यवृत्ती प्राप्त आकाशने अनेक स्पर्धांमधून पुरस्कारही मिळविले आहेत. यामध्ये सम्राट संगीत सितारा, बृहन्महाराष्ट्र आयोजित संगीत स्पर्धा, आंतरराज्य मराठी नाटय़गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.