वाळपई/प्रतिनिधी
आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंचायतींना उपक्रम राबविण्याची विनंती केली होती. त्यानुसार सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायतींनी याकामाला प्रारंभ केले असून पंचायतीमध्ये नियुक्त केलेल्या स्वयंपूर्ण मित्रांनी सरपंच, पंच सभासद व प्रति÷ित नागरिकांना मार्गदर्शन करून स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून वेगवेगळय़ा पंचायतीने नागरिकांना मार्गदर्शन करून स्वयंपूर्ण गोवा संकल्पना पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी गोवा राज्याच्या काही पंचायतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध खात्यातील योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंपूर्ण मित्र नियुक्त केलेले आहेत. स्वयंपूर्ण मित्र या योजना गावोगावी व तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायतीमधून या उपक्रमाला सुरुवात झाली. म्हाऊस येथे आयोजित केलेल्या खास बैठकीत स्वयंपूर्ण मित्र म्हणून गोवा राज्याच्या खाणसंचालनालयाचे अधिकारी श्याम सावंत यांची नियुक्ती केली होती. त्यांनी पंचायतीचे सरपंच, पंच व काही प्रति÷ित नागरिकांची चर्चा करून ही संकल्पना पुढे नेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पंचायतीच्या सरपंच वंदना गावस, उपसरपंच बाळकृष्ण गावस, पंचायत सभासद देवयानी गावस, अशोक गावकर, कृष्णा गावकर, पंचायतीचे सचिव नारायण सावंत, क्लार्क सुभाष गावकर, सामाजिक कार्यकर्ते उदय सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
यावेळी श्याम सावंत यांनी मार्गदर्शन करताना सध्यातरी पंचायत क्षेत्रातील ज्ये÷ नागरिक व विकलांग नागरिकांची नावे शोधून काढून त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आठवडय़ाभरात या नागरिकांची यादी तयार करून ती सादर करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे कृषी खाते पशुवैद्यकीय खाते समाजकल्याण खाते यांच्यामार्फत वेगवेगळय़ा ठिकाणी खास बैठकांचे आयोजन करण्यावर चर्चा करण्यात आली.
सरकारच्या माध्यमातून आपण पूर्ण सहकार्य करणार असून पंचायतीचे सचिव व सर्व कर्मचारी नागरिकांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे श्याम सावंत यांनी स्पष्ट केले.
अशाच प्रकारच्या बैठका सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा पंचायतीमध्ये झाल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकाच अध्यक्षपद वेगवेगळे पंचायतीच्या सरपंच यांनी भूषविले. यात केरी सरपंच गोविंद गावस, पर्ये सरपंच चंदन गुरव, होंडा सरपंच आत्माराम गावकर, पिसुर्ले सरपंच जयश्री परब, भिरोंडा सरपंच उदयसिंह राणे, गुळेली सरपंच अपुर्वा च्यारी, खोतोड सरपंच राजेश पर्येकर, नगरगांव प्रशांत मराठे, मोर्ले विद्या सावंत, ठाणे सरपंच प्रजिता गावस आदीचा समावेश होता.









