ब्रिटिश लॉ कमिशनकडून इशारा, काळाखोत ओळखू शकत नाही कार
ब्रिटनच्या लॉ कमिशनने स्वयंचलित वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानावरून इशारा दिला आहे. स्वयंचलित वाहन कृष्णवर्णीयांना ओळखण्यास पूर्णपणे सक्षम नाही. तसेच महिलांप्रकरणीही या तंत्रज्ञानात भेदभाव दिसून आला आहे. याच्या संरचनेत त्रुटी असून यात पूर्वग्रह दिसून येतो, यात सुधारणा न केल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.
स्वयंचलित वाहनांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. पायी चालणाऱयांना ओळखण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. कुठे थांबायचे आणि दुर्घटना कशी टाळावी याचा निर्णय त्यांना यामुळे घेता येतो. काळोख किंवा कमी प्रकाशात अश्वेतांना अधिक जोखीम असू शकते यामुळे तज्ञांनी पूर्वग्रह शब्द वापरला आहे. स्वयंचलित वाहनामंध्ये महिला आणि रस्त्यांवर योग्यप्रकारे न चालणाऱया लोकांबाबतही समस्या येऊ शकते असे लॉ कमिशनने म्हटले आहे.

ब्रिटनमधील एक स्वतंत्र यंत्रणा स्वयंचलित वाहनांसाठी कायदेशीर चौकट तयार करत आहे. ब्रिटनमध्ये 2035 पर्यंत 40 टक्के नव्या स्वयंचलित तंत्रज्ञान असलेली वाहनेच विकली जाणर असल्याचे तज्ञ चिंतेत आहेत. रस्त्यांवर उतरण्यापूर्वी या वाहनांना सर्व स्थितींमध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी पूर्णपणे तयार करण्याची गरज आहे. याच्या रोडमॅपवर काम करणाऱया संस्थेचे प्रमुख एडमंड किंग यांच्युनसार दुर्घटनांचे मोठे कारण माणसांकडून होणाऱया चुका आहेत.
सिस्टीमला व्हिलचेअर आणि मोबिलिटी स्कुटरच्या हिशेबाने प्रशिक्षित न केल्याची शक्यता आहे. प्रवासी, महिला आणि मुलांचीही काळजी घेण्यात आलेले नाही, कारण डिझायनिंग पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आले आहे. याचबरोबर सद्य फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजीही चेहऱयांचा रंग ओळखण्यास भेदभाव करत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
अमेरिकेत दुर्घटना
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेस्लाची स्वयंचलित कार झाडाला आदळली आहे. कार वेगात होती आणि टक्करनंतर यात आग लागली आहे. कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.









