देशातील प्रमुख शहरांचा समावेशः परिक्षण अंतिम टप्प्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारी स्वदेशी 5-जी नेटवर्कची पडताळणी आता अंतिम टप्प्याकडे आली असल्याची माहिती आहे. यामुळे आता स्वदेशी 5 जी नेटवर्क वापरता येणार असून ग्राहकांना दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 5-जी सेवेचा आनंद घेता येणार आहे. कारण केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून सुरू असणारी स्वदेशी 5-जी चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही प्रक्रिया येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत.
सदरच्या प्रक्रियांमध्ये आघाडीवर असणाऱया शहरांमध्ये गुरुग्राम, बेंगळूर, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि गांधीनगर यासारख्या महानगरांमध्ये ही सेवा मिळण्यासोबत नवीन सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
या शहरांमध्ये परीक्षणासह सुरुवात
एका वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडोफोन आयडीयासोबत अन्य दूरसंचार कंपन्यांनी परीक्षणास सुरुवात केली आहे. या कंपन्यांनी गुरुग्राम, बेंगळूर, कोलकता, मुंबई, चंदीगढ, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि गांधीनगरमध्ये 5-जी परिक्षणाची यंत्रणा स्थापन केली आहे.
या महानगरांमध्ये पहिली सेवा
सरकारच्या माहितीनुसार गुरुग्राम, बेंगळूर, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि गांधीनगरमध्ये आगामी वर्षात सर्वात प्रथम 5 जी सेवा सुरू होणार आहे.
आठ एजन्सीकडून काम
सरकारच्या सहकार्यातून 5- जी परिक्षणातून आठ एजन्सीकडून कार्य सुरू आहे. यामध्ये आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) मुंबई, आयआयटी, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळूर सोसायटी फॉर अप्लॉयड मायक्रोवेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि सेंटर फॉर एक्सिलेन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी आदींचा समावेश राहणार आहे. मागील 36 महिन्यामध्ये यासंदर्भात या एजन्सी काम करत आहेत.









