प्रतिनिधी /बेळगाव
स्वदेशी जागरण मंच यांच्यावतीने जागरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मंचच्यावतीने शहरातील विविध भागात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जागृती करण्यात आली. टिळकवाडी परिसरात ही जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रिया पुराणिक, निखिल जाधव, भूषण, वीणा, निहार, लक्ष्मण सिद्धू यांच्यासह स्वदेशी जागरण मंचचे सदस्य उपस्थित होते.









