ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस कोरोनाच्या 617 प्रजातींवर गुणकारी ठरत असल्याचे अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोवॅक्सिनला लवकरच जगमान्यता मिळेल, असे व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ञ डॉ. ॲन्थोनी फौची म्हटले आहे.
डॉ. फौची यांनी म्हटले आहे की, व्हाईट हाऊसच्या वैज्ञानिकांनी जे लोक भारतीय कोवॅक्सिन लस घेत आहेत, त्यांचा आभ्यास केला. त्यामधून हे स्पष्ट झाले की, भारतीय कोवॅक्सिन लस ही जगातील कोरोनाच्या 617 प्रकारांच्या प्रजातींना किंवा म्युटेंटना पुरून उरतेय. ही लस घेतल्यानंतर संबंधिताच्या शरीरात कोरोना विषाणूच्या विरोधात ॲन्टीबॉडीज् तयार होत आहेत.
दरम्यान, भारत बायोटेकची ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम चाचणीनंतर आयसीएमआरने दिला आहे. ही लस घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी आहे.









