आदिवासी गावातील पहिली पदवीधर संध्या
ऑफलाईन वर्गाच्या माध्यमातून गरजू मुलांना मोफत शिक्षण
कोरोना काळातील लॉकडाउनने ज्या क्षेत्रांना सर्वाधिक प्रभावित केले आहे, त्यात शाळा आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे. या संकटकाळात जगभरातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दुर्गम भागात राहून ऑनलाईन शिक्षण घेणाऱया मुलांसमोरील अशा स्थितीत अडचणींचा डोंगरच उभा राहिला आहे. अशा मुलांकडे मोबाईल-संगणक-लॅपटॉप-टॅबची कमतरता आहे. तसेच ऑनलाईन वर्गासाठी कनेक्शनची उपलब्धता देखील अवघड आहे.
संध्या अशा मुलांना शैक्षणिक वाटचाल करण्यास मदत करत आहे. ती कोईम्बतूरच्या चिन्नमपेथी आदिवासी गावातील पदवीधर होणारी पहिली महिला आहे. येथील गरजू मुलांना मोफत शिक्षण देण्याचे काम ती करत आहे. या मुलांना सर्व विषय शिकवत असल्याचे संध्या सांगते.
महामारीदरम्यान अनेक अडचणी असूनही संध्यासाठी मुलांना शिक्षण देण्याचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. या मुलांना कुठल्याही स्थितीत शिक्षण पुरविण्याची तिची इच्छा आहे. या गावातील काही कुटुंब गरीबीमळे स्वतःच्या मुलांना शाळेत पाठवु शकत नाहीत. बहुतांश मुले प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणानंतर गरीबीमुळे शाळेत जाणे सोडून देतात. या सर्व मुलांना मोफत शिकविते, या मुलांना लोकनृत्य आणि संगीताचे शिक्षणही देत असल्याचे ती सांगते.









