प्रतिनिधी / बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील चित्रकार अशोक हलगेकर यांनी बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वतःच्या रक्तापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचे कार्य महान असून त्यांचे ऋण फेडणे अशक्मय असल्याचे अशोक हलगेकर यांनी सांगितले.
याकरिता त्यांनी स्वतःचे रक्त काढून त्या रक्तापासून हुबेहूब आंबेडकरांचे चित्र रेखाटले. त्यानंतर या चित्रालाच अभिवादन केले. या चित्राबद्दल दलित सामाजातून कौतुक होत आहे.









