नवे शरीर तयार करण्याची कला अवगत
एखादा जीव स्वतःचे शिर कापून आणि पुन्हा एक नवे शरीर तयार करू लागल्याचे सांगितल्यास याला कपोकल्पित म्हटले जाईल. पण आता हे सत्य असल्याचे समोर आले आहे. जपानच्या वैज्ञानिकांनी सागरी जीव सी स्लगच्या दोन प्रजातींमध्ये ही विचित्र क्षमता पाहिली आहे, ज्याद्वारे ते पूर्ण शरीर तीन आठवडय़ांमध्ये परत निर्माण करतात. हा शोध योगायोगाने लागला आहे. हा जीव असा का करतो हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
3 आठवडय़ात नवे शरीर

स्वतःमधील परजीवींना बाहेर काढण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असावा असे मानण्यात येत आहे. शरीरापासून वेगळे झाल्यावर त्वरित याचे शिर बरे होऊ लागते आणि काही तासाच ते किटक खाण्यास प्रारंभ करते. एका आठवडय़ात याचे हृदय तर तीन आठवडय़ात पूर्ण शरीर तयार होते. पण केवळ शिराच्या माध्यमातूनच नवे शरीर तयार होते. धडापासून शिर तयार होऊ शकत नाही. तर तरुण जीव जुन्या जीवांच्या तुलनेत अधिक वेगाने बरे होतात.
योगायोगाने लागला शोध
युनिव्हर्सिटी ऑफ जपानधील प्राध्यापक योची यूसा आणि पीएचडी करणाऱया सायकला मिताह यांनी योगायोगाने हा शोध लावला आहे. टँकमध्ये एकेदिवशी शरीर नसलेले शिर फिरताना दिसून आल्यावर त्याचे अध्ययन सुरू करण्यात आले. याकरता अत्यंत पातळ नायलॉनच्या तारेने त्यांचे शिर कापण्यात आल्यावर ते त्वरित वाढू लागल्याचे आढळले. त्यांनी हृदय आणि अन्य अवयवही विकसित केल्याचे पाहून संशोधक चकित झाले.









