महापालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनी गौरव
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वच्छ सर्व्हेक्ष्ण 2021 अंतर्गंत आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने गौरविण्यात आले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात झालेल्या कार्यक्रमात महापालिकेच्या प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावली प्रमाणे स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 या अभियानामध्ये शहरातील नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळण्याच्या उद्देशाने महापालिकेने 19 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेतल्या आहेत. यामध्ये जिंगल, शॉर्ट मुव्हीज, पोस्टर ऍण्ड ड्रॉईंग, म्युरलर्स, स्ट्रिट प्ले इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेल्या विविध कलाकृतींची कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी करुन घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल असा प्रथम तीन क्रमांक विजेते अनुक्रमे :
जिंगल : संग्राम भालकर, अमोल गायकवाड, रविराज पोवार.
शॉर्ट मुव्हीज : प्रसाद शेडे, श्रीधर काटवे, योगिता राजगोळकर.
पोस्टर ऍण्ड ड्रॉईंग : संजय शिंदे, सोनू गोरल, स्नेहल कांबळे.
म्युरलर्स : अमोल गायकवाड, राहुल वास्कर, प्रमोद माजगांवकर.
स्ट्रिट प्ले : आसावरी लोहार व ग्रुप, गणेश पाटील, कर्तव्यदक्ष सेना (गणेश पाटील).
बक्षिस वितरण सोहळÎास यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविंद्र आडसूळ, निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.