वार्ताहर/ रहिमतपूर
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेतील सिटीझन फिडबॅगमध्ये आघाडी घेतली आहे. पालिकेने आपले सर्व पदाधिकारी व कर्मचायांच्या बारा टिम मैदानात उतरवून ’होम टू होम’ भेट देऊन लोकांचा अभिप्राय घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पालिकेने फिडबॅकमध्ये 8 हजार 145 च्या पुढे झेप घेतली आहे.
केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन टर्ममध्ये पालिकेने देशभरात मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे. आता मोहिमेच्या अंतिम लढाईसाठी पालिका पदाधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत.
रहिमतपूर शहरातील प्रत्येक वस्ती, गल्ली, चौक, रस्ते, कॉलेज व महाविद्यालय परिसर यासह ’घर टू घर’ जाऊन स्वच्छतेबाबत नागरिकांच्याकडून फीडबॅक घेण्यासाठी पालिकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या बारा टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या टीम सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत लोकांच्याकडून फिडबॅक घेण्याचे काम करत आहेत. प्रत्येक टीमला एक हजार फिडबॅक देण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. 31 मार्च अखेर टार्गेट पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली असून कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचायांची फिडबॅक घेण्यासाठी शहरभर भिरकिट सुरू आहे. कर्मचायांना बरोबर घेऊन फीडबॅकच्या कामात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकाही अगदी हिरहिरीने सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दुपार पर्यंत शहरभरात 8 हजार 145 लोकांचा फिडबॅक घेण्यात आला असून शहराच्या लोकसंख्येनुसार त्याची टक्केवारी 46.19 अशी आहे. फिडबॅकची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.
अब मंजिल दूर नही ङ
रहिमतपूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटीझन फिडबॅकमध्ये सध्या पश्चिम भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ही आघाडी कायम पर्यंत राहावी, यासाठी आमचे नेते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने व पंचक्रोशी संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने -कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धपणे कामकाज सुरू आहे. पालिकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व शहरवासीय स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसाठी सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे रहिमतपूर पालिका स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये देशात प्रथम येण्यास कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास रहिमतपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी
व्यक्त केला.
पालिकेत बैठकावर बैठका ङ
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या कामात कुठलीही हयगय होऊ नये व कामकाज नियोजनबद्धपणे सुरू राहावे, यासाठी पालिकेत नियोजनाच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. नगराध्यक्ष आनंदा कोरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी कर्मचारी व पदाधिकायांची एकत्रित बैठक घेवून दिवसभरातील कामकाजाचे नियोजन केले जाते व सायंकाळी पुन्हा बैठक घेऊन दिवसभर केलेल्या कामाची माहिती घेतली जाते. फीडबॅकच्या कामात काही अडचणी आल्यास त्या अडचणींचा निपटारा चर्चेद्वारे बैठकीत केला जाता आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमुळे पालिकेत दररोज बैठकांचा धडका सुरू आहे.









