जिल्हाधिकाऱयांची सूचना : मनपाच्या 25 हून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. भयानक परिस्थिती निर्माण झाली असून महानगरपालिका कार्यालयातील 25 हून अधिक कर्मचाऱयांना बाधा झाली आहे. त्यामुळे मनपाच्या स्वच्छता कामगारांना पीपीई किट देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी महापालिकेला केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांनादेखील लागण झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छता काम करणाऱया कामगारांना बाधा झाल्याने जीव धोक्मयात आला आहे. काही स्वच्छता कामगारांची स्थिती चिंताजनक आहे. महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नसल्याने स्वच्छता कामगारांचा जीव धोक्मयात आला असल्याची तक्रार शासनाकडे केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱयांना बोलावून स्वच्छता कामगार आणि महापालिकेच्या कर्मचाऱयांना पुरविण्यात येणाऱया सुविधांची माहिती घेतली. तसेच घरोघरी जावून कचरा जमा करणाऱया कामगारांना पीपीई किट देण्याची सूचना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच कोरोना डय़ुटी करणाऱया कामगारांची विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे.
याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता, सध्या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱया कामगारांना आणि बाधितांच्या घरचा कचरा घेणाऱया स्वच्छता कामगारांना महापालिकेकडून पीपीई किट देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच स्मशानभूमीमधील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे स्मशानभूमीमधील कामगारांना पीपीई किट देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्वच्छता कामगारांची संख्या 1100
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांची संख्या 1100 असून सर्व स्वच्छता कामगारांना पीपीई किट उपलब्ध करणे अशक्मय आहे. मात्र घरोघरी जावून कचरा जमा करणाऱया कामगारांना हॅण्डग्लोव्ज, सॅनिटायझर व मास्क देण्यात आले आहेत. ज्या घरी कोरोनाबाधित रुग्ण आहेत तेथील कचरा घेण्यासाठी विशेष स्वच्छता कामगार नियुक्त करून त्यांना पीपीई किट देण्यात आले आहेत. तसेच वेगळय़ा वाहनाची व्यवस्था करून कोरोनाबाधितांच्या घरातील कचऱयाची उचल करण्यात येत असल्याची माहिती मनपाकडून उपलब्ध झाली आहे.









