सोलापूरात ठिकठिकाणी सिटू च्या वतीने देशव्यापी जोरदार आंदोलन !
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
आधीच लॉकडाऊन आणि अनलॉक ने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडून काढले आणि त्यात सोलापूर महानगरपालिका 1 सप्टेंबर पासून स्वच्छता उपकर 50 रुपयांची नागरिकांकडून वसूल करणार आहे. वास्तविक पाहता दरवर्षी आपल्याला महापालिकेमार्फत जे विविध कर आकारणी केले जातात त्यात स्वच्छता कर समाविष्ट असताना पुन्हा नव्याने स्वच्छता उपकर कशासाठी ? असा आक्रमक सवाल आडम यांनी केला. ते पुढे म्हणाले की हद्दवाढ भागात आजही नरकयातना भोगणाऱ्या शहरवासीयांकडून सक्तीने यूजर चार्जेस च्या नावाने लाखो रुपयांची वसुली करत आहेत. ज्याचा बहुतांश भागात प्रत्यक्ष वापर नाही. नागरिकांना वेळेवर मूलभूत नागरी सेवा सुविधा देऊ न शकणाऱ्या पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांनी तातडीने स्वच्छता उपकर रद्द करावे अन्यथा महापालिका चालू देणार नाही, असा इशारा यावेळी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी कुर्बान हुसेन नगर येथे जनतेला संबोधित करताना दिला.
देशातील, शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटीत कामगार, महिला, युवा, विद्यार्थी, श्रमिक आदींनी एकत्र येऊन विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी देशव्यापी व्यापक आंदोलनाद्वारे मागणी दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने सोलापूरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम ( मास्तर ) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे राज्य महासचिव अँड एम. एच शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात जोरदार आंदोलन करण्यात आले.
देशव्यापी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :-
1.असंघटीत उद्योगधंद्यातील सर्वच कामगारांसाठी राज्य सरकार कडून 10 हजार अनुदान मिळावे आणि त्यांचे लोकडाऊन काळातील संपूर्णपणे वीजबिल माफ करावे.
2.बांधकाम कामगारांना पूर्ववत बांधकाम अवजारे खरेदी साठी रकमेची तरतूद करावी आणि तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिलेले बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे लाभ द्यावे.
3.कोविड तपासणी व उपचार मोफत करा.
4.शेतकरी विरोधी चार अध्यादेश मागे घ्या.
5.कामगार विरोधी लेबर कोड रद्द करा. फिक्स्ड टर्म रोजगार बाबतचा निर्णय रद्द करा.
6.नवे शैक्षणिक धोरण मागे घ्या.
7.वीजबिल दुरुस्ती 2020 मागे घ्या.
8.यंत्रमाग, हॉकर्स, रेडिमेड व शिलाई ,रिक्षा चालक वाहन चालक, यांच्यासह असंघटीत कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा.
9.सार्वजनिक उद्योग व सेवा यांचे खासगीकरण व विक्री रद्द करा.
10.बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता द्या.
11.कामगार कपात,वेतन कपात मागे घ्या.
12.सर्व गरजूना दरमहा माणसी 10 किलो मोफत धान्य द्या.
13.सोलापूर महानगरपालिका स्वच्छता उपकर रद्द करा.
खालील ठिकाणी कोविड 19 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याचे सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करत सरकार विरोधी घोषणा देऊन फलक दाखवले.
कुर्बान हुसेन नगर, फाकरुद्दीन नगर, सत्यसाई नगर येथे माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली दाऊद शेख, अनिल वासम , नरेश दुगाणे,जावेद सगरी, रहीम नदाफ, यांच्यासह लढाऊ कार्यकर्ते सहभागी झाले.
रंगभवन येथे सिटू चे राज्य महासचिव अँड एम एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आरिफ मणियार, अकबर लालकोट, सुनील भोसले,चांदसाब मुजावर,अनिल मोरे,खलील कोरबू, भागवत घुमटे,इर्शाद शेख आदी सहभागी झाले.
दत्त नगर येथे माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली अशोक बल्ला, गंगुबाई कणकी यांच्यासह लढाऊ कार्यकर्ते सहभागी झाले.
बापूजी नगर येथे माजी नगरसेवक माशप्पा विटे यांच्या नेतृत्वाखाली कुरमय्या म्हेत्रे, मोहन कोक्कल, गोपाळ जकलेर यांच्यासह लढाऊ कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवान नगर माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास गड्डम, अंबादास बिंगी, गीता वासम, नागेश म्हेत्रे, विठ्ठल द्यावरकोंडा, मल्लिकार्जुन बेलियार आदींचा सहभाग होता.
कॉ. गोदूताई परुळेकर वसाहत कुंभारी येथील अ विभाग येथे कॉ. युसूफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली विल्यम ससाणे, बापू साबळे, विजय हरसुरे, बालाजी तुम्मा ब विभाग येथे विक्रम कलबुर्गी, सनातन म्हेत्रे, हसन शेख, क विभाग आप्पाशा चांगले, वसीम देशमुख,
कुंभारी गाव-आप्पाशा चांगले
श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था- रामस्वामी भैरी असे एकूण 87 ठिकाणी कार्यक्रम पार पडले.
अशोक चौक – मुरलीधर सुंचू
स्वागत नगर – शकुंतला पानिभाते
गांधी नगर – लिंगवा सोलापूरे, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, शरीफा शेख
एम. आय. डी. सी. – किशोर मेहता
लष्कर – प्रा.अब्राहम कुमार, सनी शेट्टी
शास्त्री नगर – अकील शेख,आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी
राहुल गांधी नगर – महंमद हानिफ सातखेड
आदर्श नगर, इंदिरा नगर, मित्र नगर, भैय्या चौक, नरसिंग गिरजी चाळ, जुनीमिल चाळ – विरेंद्र पद्मा, बाळासाहेब मल्ल्याळ, अभिजित निकंबे, बालराज म्हेत्रे, निकिता
मीनाक्षी ताई साने विडी घरकुल – वसीम मुल्ला, दत्ता चव्हाण, राजेंद्र गेंट्याल,कुरमेश म्हेत्रे, अतिक दंडोती









