उचगाव / वार्ताहर
गांधीनगर ता.करवीर येथे अंजुमन मैन्नुद्दीन शेख (वय २१ ) या तरुणीने स्वःताला पेटवुन घेवुन टेरेसवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनेने गांधीनगर परीसरात खळबळ उडाली आहे. गांधीनगर पोलीसांत भाऊ रमजान मैन्नुद्दीन शेख याने वर्दी दिली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
गांधीनगर येथील साईबाबा मंदीर नजीक अपार्टमेंटमध्ये मैन्नुद्दीन शेख राहतात. मैन्नुद्दीन हे अर्धांगवायुग्रस्त आहेत. त्यांची पत्नी गांधीनगर मध्ये धुणीभांडीच काम करते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अंजुमन आहे. अंजुमन ही मिरज येथे नर्सिंग कोर्स पूर्ण करुन आल्यावर नर्स म्हणुन कोल्हापुर येथील एका खाजगी रुग्नालयात काम करीत होती. नोकरीत ञास होत असल्याने तिने सहा महीन्यापुर्वी काम सोडल होते. घरीची परिस्थिती बेताचीच होती. आज दुपारी भाऊ रमजान कोल्हापुरात कामासाठी गेला होता. तर आई धुणीभांडी करण्यासाठी बाहेर गेली होती.
वडील अजारी असल्याने घरी झोपले होते. अशा वेळी १२ च्या दरम्यान अंजुमन हिने टेरीस वर जावुन अंगावर रॉकेल ओतुन स्वतः ला पेटवुन घेतले. त्या स्थितीतच टेरेसवरुन खाली उडी मारली. शेजारील कमलेश चंदवाणी यांच्या घराच्या पत्र्यावर पडून पत्रा फुटून घराच्या बेडवर अंजुमन पडली. यामध्ये ती भाजुन आणि वरुन उडी मारल्याने गंभीर जखमी होवुन मयत झाली. मोठा आवाज झाल्याने नागरीक घटनास्थळी आले.पोलिसही घटनास्थळी आले. घटनास्थळावरचे चित्र फारच विदारक होते. मृतदेह शवविच्छेदन साठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली असुन अधिक तपास हे.कॉ. पाटील करीत आहेत.









