द्वारकेतील वृद्ध लोक त्यावेळी म्हणू लागले – एकदा काशीनरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेला श्वफल्क याला आपली कन्या गांदिनी दिली. तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला. अक्रूर हा श्वफल्काचा पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे. म्हणून तो जेथे राहतो, तेथे भरपूर पाऊस पडतो आणि तेथे कोणत्याही प्रकारचे कष्ट, रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत. वृद्धांचे हे म्हणणे काही लोकांना पटले व ते त्यांनी इतर लोकांना सांगायला सुरुवात
केली.
ऐसें द्वारकेमाजी वृद्ध वृद्ध । लहान थोर बुधाबुध ।
ठायीं ठायीं करिती वाद । ऐकोनि गोविंद तद्वचनें।
सभास्थानीं प्रसंगचर्चा । प्रस्ताव केला वृद्धक्तींचा।
वृद्ध मेळवूनियां त्यांचा । अभिप्राय अवगमिला । तंव ते म्हणती अक्रूर गेला । तैंहूनि द्वारके उपसर्ग आला। तस्मात् सुकृति अक्रूर भला । कल्याण जनांला तत्संगें। हें ऐकोनि जनार्दन । म्हणे यथार्थ वृद्धवचन। यदर्थीं आणीकही कारण । आम्हांलागूनि भासतसे।अक्रूर कल्याणाची मूर्ति । हे तों यथार्थचि वृद्धभारती । अपर कारणही यदर्थीं । असे तें चित्तीं विवरा हो । स्यमंतकमणि भास्करदत्त । तो जेथ असे अभ्यर्चित । तत्प्रभावही एवंभूत । हेंही यथार्थ कीं ना हो । केवळ अक्रूर गेलियासाठीं । द्वारकेमाजि अरिष्टकोटी । ऐसी प्रशंसूं नये गोठी ।अपगत शेवटीं स्यमंतकही । जेथ अक्रूराचा निवास । स्यमंतकाचाही तेथेंचि वास । तिये देशीं सुखसंतोष । अरिष्टां विघ्नांस असंभव ।
द्वारकेमध्ये अरिष्टांचे कारण काय, याविषयी सर्वत्र चर्चा व वादविवाद होऊ लागले. ते ऐकून कृष्णाने ज्ये÷ांची सभा बोलावली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा ज्ये÷ म्हणाले-
अक्रूर गेल्यापासून द्वारकेत अरिष्टे येऊ लागली. त्यामुळे अक्रूर हाच द्वारकेत पुन्हा कल्याण आणू शकेल. कृष्ण म्हणाला – ज्ये÷ जनहो! आपण सांगता ते कारण योग्यच आहे. पण त्याखेरीज अरिष्टाचे आणखीही काही कारण आहे. अक्रूर कल्याणाची मूर्ती आहे हे तुमचे म्हणणे बरोबरच आहे. तरीही अरिष्टाचे आणखी एक कारण आहे असे मला वाटते ते ऐका. स्यमंतकमणी हा सूर्यनारायणाचा प्रसाद आहे. तो ज्याठिकाणी असेल तेथे कल्याण करतो. अक्रूर आहे तेथेच स्यमंतकमणी आहे, तिथेच सुखसंतोष आहे आणि कोणतेही अरिष्ट
नाही.
वृद्धजनांची मानूनि वाणी । अक्रूरातें चक्रपाणि। पाचारूनियां सभेसी आणी। मग त्या वचनीं काय वदे । येतां देखोनि अक्रूरासी। अभ्यंत्थानें हृषीकेशी। साधुवचनीं गौरवी त्यासी। प्रियकथांसि कथूनियां। चिरकाळ वियोगाची वार्ता। आवडीचिया गोष्टी माता। परस्परें अनुवादतां । जाला बोलता काय अया।श्रीकृष्ण म्हणे अक्रूरासी । शतधन्व्यानें तुजपासीं । स्यमंतकमणि ठेविला ऐसी। गोष्टी आम्हांसि विदित असे ।प्रत्यक्ष प्रत्यय बाणला जनीं। तुवां जाऊनि काशीभुवनीं । अहरह अष्टं भार सुवर्णीं। विविधा यजनीं मख यजिले ।
Ad. देवदत्त परुळेकर








