जिल्हाधिकाऱयांना निवेदन : स्थानिक प्लंबर कामगार-कंत्राटदार अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरामध्ये विविध रस्ते, पाण्याचे पाईप जोडणे यासह इतर कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटे दिली गेली आहेत. यामुळे येथील प्लंबर कंत्राटदार तसेच कामगार अडचणीत आले असून ती कामे स्थानिक कंत्राटदारांना द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक कंत्राटदारांना कामे देणे गरजेचे आहे. असे असताना आमच्यावर अन्याय करण्यात येत आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमांतून पाणी पुरवठा विभागामध्ये आम्ही प्लंबरची कामे केली आहेत.
आम्ही जवळपास 40 हून अधिक जण स्थानिक प्लंबर कंत्राटदार असून आम्हाला आता काम देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून आम्हाला कामे द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी प्लंबर कंत्राटदार आणि कामगारवर्ग उपस्थित होता.









