बेळगाव : स्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब होत असल्याने शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गटारी, रस्ते खोदाई करण्यात आल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. येथील धर्मनाथ भवन कार्यालयाजवळ गटारी करण्यास रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याने येथील नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. गेल्या 2 आठवडय़ांपूर्वी येथील गटारीची खोदाई करण्यात आली होती. मात्र अद्याप येथील काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामामुळे गेल्या 2 आठवडय़ांपासून येथील व्यावसायिकांना आपली दुकाने बंद करावी लागली आहेत. गटारीच्या पलीकडे राहण्याऱया नागरिकांना येथून ये-जा करणे म्हणजे डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे येथील गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Previous Articleहुबळी-अंकोला रस्त्यावर टँकर उलटून चालक जखमी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









