गतवषी (2020) उद्भवलेल्या कोरोना संक्रमणाने समस्त वैश्विक जगतात अनेक उलथापालथी घडवून आणल्या. एरव्ही जगाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे अप्रूप असते. मागील वषी या अप्रूपापेक्षाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीची जगाला असोशी राहिली होती. अनेकार्थाने मागील वर्ष मानवतेला ‘धडे’ देणारे राहिले आहे. भारताच्या उच्चशिक्षण क्षेत्रातही मागील वर्षात मोठे बदल झाले. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, समाजहितैषी संशोधन आणि नवाचार (इनोव्हेशन) वाढीस लागून सामाजिक विकासाची प्रक्रिया गतिमान होईल अशी आशा बाळगूया. आपल्या देशातील काही संस्थांमध्ये चांगले काम नक्कीच होत असते. त्याचा प्रसार होऊन शिक्षण क्षेत्रातल्या रचनात्मक कामाची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. आजच्या नववर्ष प्रारंभाच्या लेखाद्वारे एका अभिनव कामाची ओळख करून घेऊया.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थांमध्ये (आयआयटी) दिल्लीची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. येथील नानाविध विभाग जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱया गोष्टींसोबत सामाजिक अभिसरणाचाही विचार करीत असतात. दिल्ली आयआयटी मध्ये रोहन पॉल नावाचा एक प्रगल्भ आणि संवेदनशील विद्यार्थी शिकण्यासाठी आला. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा त्याचा मुख्य विषय असला तरी तंत्रज्ञानाच्या समुचित उपयोगातून दिव्यांगांची गतिशीलता (मोबिलिटी) आणि शिक्षण वाढल्यास त्यांचे सामाजिक एकात्मिकीकरण (इंटिग्रेशन) होऊ शकते यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. योगायोगाने मेकॅनिकल इंजिनियरिंग ऍन्ड डिझाईन या विभागाचे प्रमुख प्रो. पी. व्ही. मधुसूदन या जाणकार प्राध्यापकाचे त्याच्या प्रयत्नाला पूर्ण सहकार्य लाभले. या जोडगोळीच्या प्रयत्नातून आयआयटी दिल्लीमध्ये सहाय्यकारी तंत्रज्ञान (असेस्टिव्ह टेक्नोलॉजी) प्रयोगशाळेचा जन्म झाला. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांसाठी नानाविध उपकरणे विकसित झाली. या अनेक उपकरणांपैकी ‘स्मार्ट केन’ या उपकरणाने जगभरातल्या दृष्टिदोष असणाऱया नागरिकांना मोठा फायदा झाला आहे.
अल्बर्ट आईन्स्टाईन हा विख्यात भौतिक शास्त्रज्ञ म्हणायचा, ‘जर माझ्याकडे एखादा प्रश्न वा समस्या सोडवण्यासाठी एक तास वेळ असेल, तर 55 मिनिटे मी प्रश्नांचा सांगोपांग विचार करण्यावर आणि उर्वरित 5 मिनिटे मी त्याच्या उत्तराबाबत विचार करण्यावर खर्च करेन’ थोडक्मयात, संशोधनाची यथार्थता, उपयुक्तता जर तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचवायची असेल तर ‘समस्या ते लाभधारक’ या शृंखलेतील सर्व घटकांचा संशोधनामध्ये समावेश व्हायला हवा. प्रकल्पांच्या-प्रारुपांच्या संशोधनामध्ये नमुना-प्रतिमान (प्रोटोटाईप) विकसित करण्यामध्ये आराखडा (डिझाईन), बांधणी (बिल्ड), चाचणी (टेस्ट), अपयश (फेल), सुधारणा (मॉडिफाय) हे टप्पे सर्वसाधारणपणे वापरले जातात. प्रकल्प-नमुने अपयशी ठरण्यामागील एक कारण म्हणजे संबंधित भागधारकांचा (स्टेकहोल्डर्स) मर्यादित वा नगण्य सहभाग. ‘स्मार्ट केन’च्या प्रारुप विकसन संशोधनात पांढरी काठी वापरणारे, कुटुंबीय आणि काळजीवाहक, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱया स्वयंसेवी संस्था, शासकीय आणि अनुदानित संस्था, संशोधक, विद्यापीठे, उद्योजक, विशेष शिक्षक, पुनर्वसन तज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि उद्योजकांचाही समावेश होता. यासोबतच दृष्टिहीन नागरिकांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या गरजा, अधिवास, शारीरिक-मानसिक-आर्थिक अशा अनेक घटकांवर संशोधन करण्यात आले. प्रत्येक टप्प्यावर येणाऱया अपयशांवर पुनः पुन्हा काम करण्यात आले. प्रो. मधुसूदन सरांच्या मते चांगल्या आंतरशाखीय संशोधनांमुळेच नवाचारांची यशस्वीता वाढत असते. नवाचाराच्या संशोधनामध्ये डिझाईन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान, मानव्य शाखा, सामाजिक धोरणे यासारख्या ज्ञानशाखांचा संगम लागतो.
प्रो. मधुसूदन यांच्या नवाचार प्रयोगशाळेमध्ये लाभधारकांची सहभागिता आणि संशोधनांमधील आंतरशाखीयता या दोन गोष्टी आवर्जून पाळल्या जातात.सहाय्यकारी तंत्रज्ञान हा तुलनेने नवा शब्द असला तरी चष्मा, श्रवणयंत्रे, पॉईंटर, तापमापक, रक्तदाब मापन यंत्र यासारख्या कितीतरी गोष्टींनी आपले दैनंदिन आयुष्य सुलभ केलेले आहे. दृष्टीहिनांच्या आयुष्यामध्ये ‘व्हाईट केन’चे मोठे स्थान आहे. या काठीच्या सहाय्याने त्यांना चालताना भूपृ÷ावरील पुढील एक दोन फुटांवर असणाऱया अडथळय़ांचा अदमास लागतो. आपल्या देशात दुर्दैवाने आजही रस्त्याच्या कडेला पडलेली झाडे, अस्ताव्यस्तपणे रस्त्यावरच थांबलेली वाहने, टोकदार सामानाने भरलेल्या मालवाहतूक गाडय़ा कुणाचीही पर्वा न करता रस्त्यावर उभ्या असतात. पादचारी मार्गावर विपेते संबंधित पालिका वा संरक्षकांच्या संगनमताने राजरोसपणे बसलेले असतात. आपली बेपर्वाई वा असंवेदनशीलता ही अंध, अपंग (डिफरंन्टली एबल्ड) नागरिकांसाठी घातक ठरू शकते हे अनेकदा आपल्या जाणिवेच्या कक्षेतही नसते. विकसित देशांमधील अनेक संरचनांमध्ये दिव्यांगांच्या गरजांचा विचार करून समावेशक संसाधने उभारण्याकडे कटाक्ष असतो.
‘स्मार्ट केन’चे प्रारुप विकसित करताना दृष्टिहीन नागरिकांना समोरील अडथळय़ांचे धोके हाताच्या पकडीमधील होल्डरच्या कंपनामुळे कळतात. ज्याप्रमाणे पांढरी काठी भूपृ÷ावरील धोके स्पर्श ज्ञानाने जाणवून देते त्याचप्रमाणे ‘स्मार्ट केन’ ही मार्गक्रमणेतील सर्व प्रकारचे अडथळे कंपनाद्वारे अनुभूत करते. या उपकरणाचे वजन अवघे 136 ग्रॅम आहे. हे उपकरण रिचार्ज करता येते. यामधून येणाऱया बीपच्या आवाजामुळे बॅटरीची क्षमता कळते. हा बीपचा आवाज वगळता इतर कोणत्याही आवाजाद्वारे अडथळे ओळखण्याच्या दृष्टीने संशोधन केले गेले नाही. आपली विकलांगता जाहीरपणे लोकांच्या पुढे येणे हे कुणाहीसाठी प्रति÷sचे नसते. एकदा रिचार्ज करून हे उपकरण आठवडाभरासाठी उपयोगात आणता येते. अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन आणि सेन्सरच्या उपयोगातून हे उपकरण विकसित झाले आहे. ‘स्मार्ट केन’ विकसित होण्याचा प्रवास समजून घेणे शैक्षणिक आणि रंजक आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून जगभरातील उपयुक्त असणारी उपकरणे (अल्ट्रासॉनिक टॉर्च, गॉगल, हेल्मेट इ.) त्यांनी आठवडाभर लोकांना वापरायला दिली होती. या उपकरणाच्या जमेच्या आणि मर्यादांच्या बाजू त्यांनी समजून घेतल्या होत्या. निव्वळ आपल्या उपकरणामुळे लोकांनी आपल्या अनेक वर्षांच्या सवयी न बदलवता त्यांनी आपले प्रतिमान सदैवच अद्ययावत करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता.
ज्या रोहन पॉल यांना या ‘स्मार्ट केन’ची कल्पना सुचली ते ‘ऱहोड’ शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डला गेले, पोस्ट डॉकसाठी एमआयटी मध्ये गेले. ते आता शिक्षक बनून आयआयटी दिल्लीमध्ये परतले आहेत.
डॉ. जगदीश जाधव








