वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियन कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्सने रोलेबल स्मार्टफोनच्या निर्मितीमधून माघार घेतली नसल्याचा खुलासा नुकताच केला आहे. यासंदर्भात केल्या गेलेल्या अफवांचे एलजी कंपनीने खंडन केले आहे. युनहॅप न्यूज एजन्सीच्या माध्यमातून एलजी कंपनीने हा खुलासा केला आहे. सध्याला रोलेबल स्मार्टफोन विकासाचा प्रकल्प तात्पुरता थांबवला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
रोलेबल स्मार्टफोन विकासाचे कार्य यापुढेही असेच सुरूच राहणार असल्याचे कंपनीने सांगितले. परंतु भविष्यातील योजना मात्र कंपनीने स्पष्ट केलेली नाही. 2015 मध्ये दुसऱया तिमाहीपासून एलजीचा मोबाईल व्यवसाय अडचणीत सापडत असल्याचे दिसले. त्यामुळे अनेक तज्ञांनी एलजी कंपनी स्मार्टफोन निर्मितीमधून बाहेर पडणार असे मत व्यक्त केले होते. तसे होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.









