प्रतिनिधी / बेळगाव
कोविड-19 मुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून हिंडाल्को कंपनीने मदतीचा हात पुढे केला आहे. 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते, महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा संकुलाच्या हॉस्टेलमध्ये 20 खाटाचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हे कोविड केअर सेंटर सोयीचे ठरले आहे.
शहरात कोरोनाचा उदेक वाढत असून दररोज कोरोनाचा आकडा वाढत आहे. पण ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. परिणामी ऑक्सिजनअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सध्या रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा आधार घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासियांची गरज ओळखून हिंडाल्को कंपनीने 25 कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. यांचा वापर गरजूंसाठी करण्यात येत आहे.
सर्व बेड्स फुल्ल
महापालिकेने गरजूंना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आरोग्य खाते आणि महापालिकेच्या माध्यमातून नेहरुनगर येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी 20 खाटाचे केअर सेंटर सुरू करण्यात आले असून सर्व बेड्स सध्या फुल्ल झाले आहेत.
ऑक्सिजनची अत्यंत गरज असलेल्या कोरोनाबाधितांना याठिकाणी दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी रुग्णांची चांगली सोय झाली आहे.









