क्रीडा प्रतिनिधी/ पणजी
पणजी आल्फ्रान प्लाझा येथे शुक्रवारी मुक्तार काद्री स्पोर्ट्स सेंटर या शोरुमचे माजी गृहबांधणी मंत्री जयेश साळगांवकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सन्मानिय पाहूणे म्हणून गोव्याचे प्रसिध्द क्रिकेटर स्वप्नील अस्नोडकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकारी मोनिका दुरादो व तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर उपस्थित होते.
मुक्तार काद्री हे चांगले क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. आम्ही अनेकदा आमने-सामने खेळलो आहेत. त्याला क्रिकेटबद्दल अपार प्रेम आहे. मला खुप आनंद आहे की मुक्तार आपल्या आवडत्या क्षेत्रातच काम करत आहे. त्याला भविष्यात यश मिळो. असे मत यावेळी जयेश साळगांवकर यांनी व्यक्त केले.
मुक्तार काद्री यांचे मी अभिनंदन करतो. त्याने क्रीडा क्षेत्रात आपले नाव केले आहे. आता क्रीडा साहीत्याचे शोरुम प्रस्थापित करुन त्याने खेळासाठी असलेले प्रेम दाखवून दिले आहे. भविष्याला मुक्तार काद्री याला खुप शुभेच्छा असे स्वप्नील अस्नोडकर यांनी सांगितले. तसेच मोनिका दुरादो व सागर जावडेकर यांनी यावेळी सांगितले की मुक्तार काद्री या कोरोनाच्या काळात नविन सुरुवात केल्याबद्दल प्रोत्साहन केले. तसेच या क्षेत्रात काद्री यांची प्रेरणा घेऊन नविन युवकांनी पुढे येऊन काम करावे









