तिस्क-उसगांव एटीएम दरोडाप्रकरणी फोंडा पोलिसांची कारवाई : भंगारअडय़ावाले पोलिसांच्या रडारवर-उपअधिक्षक सी एल पाटील : आंध्रप्रदेश येथून चोरटय़ांना अटक
प्रतिनिधी / फोंडा
ऐन सणासुदीच्या काळात ‘स्पेशल 26’ स्टाईलने धाडसी दरोडा घालून परराज्यात गायब होणाऱया टोळीच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांनी अखेर यश मिळवले आहे. तिस्क उसगांव येथील एटीएम चोरीप्रकरणी दोघां बांगलादेशीना फोंडा पोलिसांनी गंगानगर आंध्रप्रदेश येथून अटक केली आहे. संशयिताविरोधात दरोडाप्रकरणी भां.दं.सं. 395 कलमाखाली नुन्हा नोंदवून पाच दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी मुख्य सूत्रधार सायमन हा पोलिसांच्या हातात सापडलेला नसून त्याचे दोघां बांगलादेशी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. जहांगीर इस्लाम (32) व शेख नदीम खान (52) अशी त्यांची नावे आहेत. सहाजणापैकी दोघाजणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत. या चोरटय़ांचे राहण्य़ाचे एक ठिकाण नसून ते सर्व मूळ बांगलादेशी किंवा रोहिंग्या असल्याचा दाट संशय फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिस्क उसगांव येथील दोन एटीएम मशिन्स अज्ञात चोरटयांनी पळवून सुमारे 28 लाखांची रोकड लांबविल्याची सदर घटना 18 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती.
दरोडय़ानंतर नियोजित स्थानावर पोचणे हाच नियम
मात्र घटनास्थळाच्या सुमारे 500 मिटर अंतरावर आढळलेल्या दोन मशिन्सपैकी एक एटीएम मशिन फोडण्यात चोरटे अपयशी ठरले. दुसऱया एटीएमधून सुमारे 13 लाखाची रोकड चोरटय़ानी लांबवून धूम ठोकली. तिस्क उसगांव येथील एकमेकांना लागून असलेल्या कॅनरा बँक व एचडीएफसी बँकेचे एटीएम या चोरटय़ांनी लांबविली. पळविलेली दोन्ही एटीएम्स फोंडा बेळगांव महामार्गावरील धारबांदोडा मार्गाच्या बाजूला कुळण येथे फोडलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यापैकी कॅनरा बँकचे एटीएम उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले होते. ज्यामध्ये सुमारे 14 लाखाची रोकड होती. एचडीएफसी बँकचे एटीएम फोडून सुमारे 13 लाख 37 हजार दोनशे रूपयांची रोकड लांबवून चोरटे मडगांवमार्गे थेट हुबळीहून रेल्वेमार्गे विजयवाडा आंध्रप्रदेश गाठले होते. एखाद्या फिल्म ‘स्पेशल 26’ स्टाईलने नियोजनबद्ध दरोडा घालण्यात ही टोळी माहीर असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती फोंडा पोलिसांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेऱयामूळे झाला उलगडा

सीसीटीव्ही कॅमेऱयात तीन चोरटय़ानी एटीएमच्या खोलीत प्रवेश घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर इमारतीच्या खाली पार्क केलेली ओमनी कारगाडीसह मडगांव येथे सापडली होती. मडगांव शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱयाची फुटेज व त्यानंतर फोंडा पोलिसांनी चार टीम स्थापून केलेल्या आंध्रप्रदेश पोलिसांना सतर्क केल्यामुळे दरोडय़ातील संशयिताना सापडणे शक्य झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक सी एल पाटील यांनी दिली. मडगांवहून चोरटय़ांनी बसमार्गे थेट हुबळी गाठले होते. सुमारे रू. 13 लाखची रोकड एकूण सहा भागात विभागून घेतली होती. हुबळी येथील एका ज्युवेलर्सकडे रोकड देऊन सोन्याचे दागिने न घेता त्याच्याकडून सान्याचे बिस्किट खरेदी केल्या होत्या. फोंडा पोलिसांनी दोघां संशयिताकडून सुमारे रू. 5 लाख किमतीचे सोन्याच्या बिस्कीट जप्त केल्या आहेत.
उसगांवह्tन ओमनीमार्गे मडगांवहून हुबळी रेल्वेमार्गे विजयवाडा.. आंध्रप्रदेश गाठले
चोरटय़ांनी उसगांव येथे चोरीच्या घटनेच्या मध्यरात्री 2 ते 3 वा. दरम्यान एटीएम फोडल्यानंतर ओमनी कारने मडगांव गाठले होते. मडगावहून हुबळी बसमार्गे प्रवास केला. हुबळी येथे रोकड सोन्याच्या रूपात रूपांतरीत करून रेल्वेमार्गे ते विजयवाडा रेल्वे स्टेशनवर उतरले होते. तेथे पोचल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी त्यानी आध्रप्रदेश येथे असेच एक एटीएम मशिन फोडण्य़ाच्या प्रयत्नात आध्ा्रप्रदेश पोलिसांनी त्याना अटक केली होती. फोंडा पोलिसांनी आध्रप्रदेश पोलिसांशी सदर घटनेशी जुळवाजुळव करीत चोरटे तावडीत सापडले होते.
फुटपाथशेजारी झुडुपानी झोपडय़ा थाटून करतात चोरीचे नियोजन
गोव्यातील एटीएम दरोडय़ापुर्वी ते पहिल्यांदा रावणफोंड मडगांव येथे रस्त्याच्या कडेला झुडुपात निवारा केला केला. त्यापैकी काही लोकांना फोंडय़ातील काही एटीएमची रेकी केली होती. उसगांव येथे चोरीच्या घटनेच्या आदल्या दिवशी रेकी केली होती. मुख्य सुत्रधारालाच मोबाईल वापरण्याची मुभा आहेत अन्य साथीदारपैकी कुणीच मोबाईल वापरत नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. भिकाऱयासारखे वास्तव्य़ास राहून अत्यंत नियोजनबद्धरित्या मोठय़ा दरोडय़ाचा डाव आखून त्यात यशस्वी होतात. नेहमी रस्त्याशेजारी वास्तव्य़ास असलेल्यापैकी काहीजण भंगारअंडय़ात काम करीत रेकी करीत असल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला असून राज्यातील भंगारअंड्डे सद्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत.
कुंकळय़े चोरीनंतर मंगेशी चर्च एटीएम टार्गेट होते काय ?
उसगांव येथील चोरीच्या घटनेच्या दिवशी कुकळय़े येथे एका दुकानात चोरीचा प्रयत्नात मडगांव येथील अज्ञात दुचाक्या घटनास्थळावर सोडून चोरटय़ांनी पलायन केले होते. चोरटे यापैकीच होते काय? हा प्रश्न फोंडा पोलिसांनी दुर्लक्षीत ठेवलेला आहे. मंगेशी येथील चर्चजवळील एटीएम फोडण्य़ाचा डाव होता? की फसला? याची शहानिशा होणे गरजेचे आहे. जप्त केलेल्य़ा दुचाकीविषयीही कोणतेच सोपस्कर अजूनपर्यत पुर्ण झालेले नाहीत.
फोंडा पोलीस टीम कौतुकास पात्र
18 ऑगस्ट रोजी एटीएम चोरी म्हणून नोंद केलेली घटना सखोल तपासाअंती दरोडा म्हणून नोंद केल्यानंतर दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली हायअलर्टवर काम करीत उपअधिक्षक सी एल पाटील, निरीक्षक विजयकुमार चोडणकर, साजिथ पिल्लई, उपनिरीक्षक आदित्य वेळीप, सुरज काणकोणकर, विभीनव शिरोडकर, नितेश काणकोणकर हवालदार केदारनाथ जल्मी, अमेय गोसावी, मयुर जांबोटकर अशा फोंडा फोलिसांच्या विविध टीम स्थापून ही कारवाई केली.









