वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या रिओ खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या मुनेरचे आव्हान पहिल्याच फेरीत स्पेनच्या ऍलकॅरेजने संपुष्टात आणले. स्पेनच्या मार्टिनेझने तसेच जर्मनीच्या ओटे यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात कार्लोस अलकॅरेजने आपल्याच देशाच्या मुनेरचा 2-6, 6-2, 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱया एका सामन्यान स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझने 17 वर्षीय सेंगचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. जर्मनीच्या ओटेने जपानच्या निशीओकावर 7-6 (8-6), 6-3 तसेच इटलीच्या सिप्पीने जर्मनीच्या गोझोव्हिजेकचा 7-5, 6-4 असा फडशा पाडत दुसऱया फेरीत प्रवेश केला.









