वृत्तसंस्था/ शांघाय
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या शेनझेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या 26 वषीय गार्बेनी मुगुरुझाचे आव्हान उपांत्यफेरीत समाप्त झाले. रशियाच्या ऍलेक्सेड्रोव्हाने मुगुरुझाचा 6-4, 6-3 असा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. कझाकस्तानच्या रिबेकिना आणि झेकची प्लिस्कोव्हा यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर ऍलेक्सड्रोव्हाचा अंतिम फेरीतील सामना होईल. 25 वषीय ऍलेक्सड्रोव्हाने हा उपांत्य फेरीचा सामना 77 मिनिटात जिंकला. आता ती डब्ल्यूटीए टूरवरील पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.









