वृत्तसंस्था/ बेलग्रेड
स्पेनची महिला टेनिसपटू पाओला बॅडोसाने डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकाविले. बेलग्रेडमध्ये शनिवारी झालेल्या महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत बॅडोसोने एकेरीचे जेतेपद पटकाविले.
स्पेनची चौथी मानांकित बॅडोसा आणि क्रोएशियाची कोंजु यांच्यात एकेरीचा अंतिम सामना खेळविला गेला. या सामन्यात बॅडोसाने कोंजुवर 6-2, 2-0 अशी आघाडी मिळविली होती. दरम्यान दुखापतीमुळे कोंजुने दुसरा सेट अर्धवट सोडल्याने बॅडोसाला विजेती महणून घोषित करण्यात आले.









