वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी ओडिशा एफसी फुटबॉल क्लबने स्पेनचा मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू व्हिक्टर माँगिलशी नवा करार केला आहे. माँगिल यापूर्वी एटीके-बागान संघाकडून खेळत होता.
गेल्या वर्षीच्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात सर्वाधिक गोल नोंदविणाऱया इगोर ऍग्यूलोने ओडिशा एफसी संघाची ऑफर नाकारली होती. 2019-20 हंगामात इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद एटीके-बागान संघाने मिळविले आहे.









