वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने एकेरीची अंतिम फेरी गाठताना आपल्याच देशाच्या बुस्टाचा पराभव केला. आता नदाल आणि ग्रीकचा सिटसिपेस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. नदालने या स्पर्धेत 12 व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील टॉप सीडेड नदालने आतापर्यंत 11 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात नदालने स्पेनच्या बुस्टाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात ग्रीकच्या सिटसिपेसने इटलीच्या सिनेरचा 6-3, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. सिटसिपेसने अलिकडच्या कालावधीत एकही सेट न गमविताना सलग नऊ सामने जिंकले आहेत.









