वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे झालेल्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या 19 वर्षीय कार्लोस अॅलकॅरेझने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात अॅलकॅरेझने ग्रीकच्या सित्सिपेसचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला आहे. अॅलकॅरेझने 2023 च्या टेनिस हंगामात तिसरी स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी त्याने ब्यूनोस आयरिस तसेच इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या.









