दक्षिणेचा सुपरस्टार प्रभास मागील काही दिवसांपासून स्वतःचा 25 वा चित्रपट ‘स्पिरिट’वरून चर्चेत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात प्रभासची नायिका म्हणून करिना कपूर काम करणार असल्याचे वृत्त आहे.

स्पिरिट चित्रपटात प्रभाससोबत करिना कपूरची निवड करण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांची पहिली पसंती करिनाच आहे. टी-सीरिजच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. तर संदीप रेड्डी वांगा याचे दिग्दर्शक आहेत. 7 ऑक्टोबर रोजी प्रभासने या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि हिंदीसोबत जपानी, चिनी आणि कोरियन भाषेत प्रदर्शित होणार आहे.
याच बरोबर करिना लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होणार रियलिटी शो ‘हुनरबाज-देश की शान’मध्ये दिसून येणार आहे. या शोचे परीक्षक म्हणून मिथून चक्रवर्ती काम पाहणार आहेत. तसेच करण जोहर देखील यात परीक्षकांमध्ये सामील असल्याचे समजते.









