तिसरे जेएमएफसी न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस रोड, टिळकवाडी येथे युनिसेक्स स्पा मसाज सेंटरच्या नावाने अनैतिक धंदा थाटणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली होती. सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी मसाज सेंटरवर छापा टाकुन ही कारवाई केली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतिय न्यायालयाने जामीनवर त्यांची सुटका केली आहे.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली होती. काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील नेल्सन हाईटस् अपार्टमेंटमधील न्यू गेट वे युनिसेक्स स्पा मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. त्या प्रकरणी प्रकाश कन्नाप्पा येळ्ळूरकर (वय 27, रा. मराठा कॉलनी, टिळकवाडी), विनायक केदारी शिंदे (वय 37, रा. मरगाई गल्ली, जुने बेळगाव) या दोघांना अटक झाली होती. या दोघांनी न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन 25 हजार रुपयांचे प्रत्येकी वैयक्तिक हमीपत्र, प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे, महिन्याच्या दुसऱया सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी देणे, साक्षीदारांना धमकावू नये, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये अशा अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात संशयितांच्यावतीने ऍड. प्रताप यादव यांनी काम पाहिले.









