प्रतिनिधी / लांजा
स्पर्धा परीक्षा वारंवार पुढे ढ़कलण्यात येत असल्याच्या नैराश्यातून मानसिक संतुलन बिघडलेल्या एका २६ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथे घडली आहे.
याबात लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोर्ले गावातील सहकारवाडी येथील महेश लक्ष्मण झोरे (२६वर्षे ) हा अत्यंत हुशार मेहनती मुलगा होता. त्याचे आई, वडील व दोन भाऊ कामानिमित्त मुबईला राहतात. महेश याला एमपीएससी ही स्पर्धा परीक्षा देवून अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो गावातील आपल्या राहत्या घरी एकटाच राहत होता.
महेश याला भेटण्यासाठी प्रभानवली येथील त्याचे आजोबा अधुनमधून कोर्ले सहकारवाडी गावी येत असत. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी आपल्या नातवाला भेटण्यासाठी दुपारच्या दरम्याने आले असता त्यांना महेश हा गळपास लावलेल्या अवस्थेमधे आढळून आला. महेश याने आपल्या राहत्या घराच्या पडवीच्या वाशाला गळफास लाऊन आत्मत्या केली होती.
महेश याने आत्मत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. स्पर्धा परिक्षेची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्या कारणाने माझे सतुंलन दिवसेंदिवस बिघडत चालले होते. या कारणाने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे. तरी माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये असे महेश याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
दरम्यान, याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर हे करीत आहेत.