रवींद्र फोगेरी यांचे मत, लाटंबार्से येथील विद्यार्थ्यांचा गौरव
लाटंबासै- वार्ताहर
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी शिक्षण हे खूपच महत्त्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा योग्य समन्वयक घडवून आणल्यास आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मोठे यश संपादन करु शकतो असे मत सेंट झेवियर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक रविंद्र फोगेरी यांनी नानोडा येथील श्री शांतादुर्गा कलंगुटकरीण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लाटंबासै मतदारसंघातील दहावी, बारावी, पदवी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर व्हीजन होस्पीटलचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रकांत शेटय़?, लाटंबासै मतदार संघातील जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़?, शांतादुर्गा क्रीडा व कला संघाचे अध्यक्ष प्रसाद गाड, अडवलपालचे पंचायतीचे सरपंच मनोज साळगांवकर, उपसरपंच दिपाली गांवस, लाटंबासै पंचायतीचे उपसरपंच यशवंत वरक, साळचे उपसरपंच वर्षा साळकर, मुळगांवच्या उपसरपंच आनंदी परब, पाचही पंचायतीचे पंच, माजी सरपंच लाटंबासै तथा नानोडा शांतादुर्गा क्रीडा व कला संघाचे माजी अध्यक्ष शाम हरमलकर, संतोष कलंगुटकर, शिवगुरू नानोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रविंद्र फोगेरी म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना ध्येय बाळगून शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यातून विद्याथ्याची प्रगती घडू शकते. विद्यार्थी शिस्तपीय असावा.शिक्षणाबरोबर विद्याथ्याकडे शीस्तही महत्त्वाची आहे. शिक्षणातून सेवा करावी व त्यातून मिळणा-या मिळकतीतून वीस टक्के भाग देवासाठी दानधर्म करावा असेही ते म्हणाले. शिक्षणातून समाजाचे ऋण फेडावे. कोणतेही काम असो मग ते लहान असो किंवा मोठे मन लावून करा यश नक्कीच मिळेल.
आजच्या शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांकडे शिक्षणाबरोबर बाहेरील ज्ञानही असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून जीध्दीने काम करा. डीजीटल जग झाल्याने टीकाही स्वाभाविक असून प्रत्येक टीकेला सामोरे होवून लोकांनी सांभाळून काम करावे. पदवी मिळवण्याबरोबर नवीन संस्कृतीही शिकून घ्यावे त्यातूनही विद्यार्थ्यांना यश मिळू शकते असे डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षांपासून व्हीजन होस्पीटल पंचायतीतील इतर संस्थेबरोबर विद्यार्थि गुणगौरव कार्यक्रम आयोजित करीत आहे. शहराबरोबर गावातील विद्या थ्यानी शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती साधलेली आहे. गावातील विद्यार्थि ही आज पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण मिळवू लागल्याने गावातील मुलेही शिक्षणात कमी नसल्याचे जाहीर झाले आहे. मुलांनी उच्च शिक्षण घेवून गावाबरोबर देशात आपले नाव अजरामर करावे. विद्यार्थ्यांचा कल डॉ क्टर, इंजीनियर होण्याबरोबर आयएएस, आयपीएस या स्पर्धा त्मक परीक्षेसाठी तयारी करणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी माझे सदैव सहकार्य असणार असल्याचे संजय शेटय़? यांनी सांगितले.
प्रदीप रेवोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्हीजन होस्पीटलचे गुणगौरव कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून राबवीत असल्याने कौतुक केले. पंचाहत्तर टक्के गुण गावातील मुलेही मिळवू लागल्याने हा त्यांच्यासाठी मोठा मानसन्मान आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी दहावी मधून 26, बारावी मधून 14 तर पदवीमधून 35 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन विदेश कानोळकर व स्मिता गाड तर आभार प्रदर्शन शुभदा कळंगुटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कला संघाच्या प्रत्येक सदस्याचे मोठे सहकार्य लाभले.









