ओटवणे प्रतिनिधी :
मूळच्या माणगाव तांबळवाडी येथील आणि सध्या माडखोल देऊळवाडा येथील रहिवाशी स्नेहलता मधुकर नाईक (६९) यांचे बुधवारी ७ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. जत्रोत्सवात फुल विक्री करणाऱ्या स्नेहलता नाईक आशा फुलवाली म्हणून माडखोल परिसरात परिचित होत्या. माडखोल येथील भाजी विक्रेते तथा दूध डेअरी चालक संतोष नाईक यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, बहिणी, जावई असा परिवार आहे.









