गोवा फॉरवर्डचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
गोवा भाजप सरकार व मुख्यमंत्री स्थानिक गोमंतकीयांना न्याय देण्यास अपयशी ठरले आहे. या सरकारने गोवा घटक राज्याचा दर्जा घालावल्याने आज स्थानिक गोमंतकीयांनी सरकार विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे सरकारविरोधात ‘क्राईम टू बी अ गोवन इन गोवा?’ या नावाने सोशल मिडीयावर प्रचार मोहिम राबविणार आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप सरकारला स्थानिक गोमंतकीयाचे काहीच पडले नाही आज स्थानिक मासेमारी, टॅक्सी व्यवसायिक सरकार विरोधात आवाज करत आहे. पण त्यांना न्याय दिला जात नाही. हे सरकार गोव्याची स्वातंत्र्य ओळख नष्ट करायला उठले आहे. त्यामुळे नीज गोयकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गोव्याचा मुळ व्यवसाय नष्ट करुन परप्रांतीयांना संधी देण्याचा डाव आहे. आज गोमंतकयांना कुठेच न्याय मिळत नाही, असे यावेळी विजय सरदेसाई म्हणाले.
कोरोना विषयी सरकारचे राजकारण
सध्या कोरोना विषयी सरकार राजकारण करत आहे. आज जे मुळ गोमंतकीय बाहेर आहे त्यांना गोव्यात आणण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यांच्याकडून 2 हजार रुपये क्वारंटाइन करण्यासाठी घेतले जतात. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तसेच त्यांना इन्स्टीटूशनल क्वारंटाईन केले जाते. होम क्वारर्टाइन सरकारने बंद पेल आहे. आज गोमतकीयासाठी परप्रांतीय जे गोव्यात येत आहे त्यांसाठी वेगळी एसओपी सरकार करत आहे. हे एक प्रकारे राजकारण सुरु आहे.
गोमंतकीयांना मोफत क्वारंटाईन करा
आज बिनदास्त पणे बाहेरील लोक गोव्यात दाखल होत आहे. यात जास्त sगोव्यात व्यवसाय करणारे आहे. पण जे गोमंतकीय नोकरीसाठी बाहेर परदेशात गेले आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो जे गोमंतकी बाहेरुन आले आहे त्यांना कोरोना नेगॅटीव्ह सर्टीफिकेट मिळाल्यावर घरी पाठवा व त्यांना मोफत क्वारटाईन करावे, असे विजय सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्र्याना पर्यटन सुरु करण्याची घाई
मुख्यमंत्री सध्या गोव्यात पर्यटन सुरु करण्यासाठी घाई करत आहे. सध्या चौथा लॉकडाऊन सुरु होणार असून मुख्यमंत्री याचे काहीच नाही. आज जी सरकारची जी राज्य कार्यकारी समिती आहे ती मंत्र्यांचा दबावाखावी निर्णय घेत आहे. या समितीला स्वांतंत्र्य निर्णय घेता येत नाही सरकारच्या हिताचा निर्णय घेत आहे. एकंदर हा सगळ चालत आहे. आरोग्या मंत्री एक सांगत आहे तर मुख्यमंत्री एक सांगत आहे या सरकारला स्थानिक गोमंतकीयाचे पडले नसून सरकार टिकविण्याचे पडले आहे. आम्ही सरकारचे गोमंतकयीविरोधी निर्णय मोडून टाकणार आहे, असे यावेळी विजय सरदेसाई म्ह्णाले.
यावेळी त्यांच्या सोबत गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर व जयेश साळगावकर उपस्थित होते.









