महावितरणचा ग्राहकांना झटका, ग्राहकांची पळापळ सुरू
प्रतिनिधी/नागठाणे
राज्यसरकारने अधिवेशनाच्या सुरवातीच्या काळात महावितरणच्या थकीत वीजबिल वसुलीला स्थगिती दिली होती. त्यामुळे थकबाकी असलेल्या विद्युत ग्राहकांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र राज्यशासनाचा हा निर्णय औट घटकेचाच ठरला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्जामंत्र्यानी थकबाकीदारांचा विजकनेक्शन तोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि ग्रामीण भागात ऐन सुट्टीच्या दिवशी महावितरणने लागलीच पावले उचलत थकाबाकीदारांची कनेक्शन कट करण्यास सुरवातही केली. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पळापळ उडाली आहे. अनेक ठिकाणी ग्राहक व वायरमन यांच्यात शाब्दिक चकमकीही झडू लागल्या आहेत.
कोरोना काळात आलेल्या वाढीव विजबिलांमुळे ग्राहकांना वीजबिल भरणे अशक्य झालेने ही बिले थकीत झाली. त्यातच उर्जामंत्रांनी कोरोना काळातील विजबिले माफ होतील असे जाहीर करून पुन्हा यु टर्न घेतल्याने या थकीत विजबिल ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. यामुळे विजबिले भरावीत की ती माफ होणार? या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या ग्राहकांची विजबिले मात्र फुगली गेली. ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण असतानाच विविध संघटना व पक्षांनी आंदोलने करून कोरोना काळातील विजबिले माफ करावी अशी मागणी केली होती.दरम्यान अधिवेशनाच्या सुरवातीला हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज वितरणच्या थकीत वीजबिल वसुलीला स्थगिती दिली.यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकीदार विजग्राहकांचे विद्युत कनेक्शन तोडण्याचा निर्णय जाहीर केला. याची अंमलबजावणी महावितरणने तात्काळ करण्यास सुरवातही केली. निर्णयाच्या दुसऱ्याच दिवसांपासून वायरमन ग्रुपने ग्रामीण भागात पक्कड घेऊन फिरू लागले आहेत. ‘सातारा ऑफिसला थकीत वीजबिल भरा नाहीतर कनेक्शन कटच….” अशी अमंलबजावणी सुरू झाली असून अनेक ग्राहकांची वीजकनेक्शन तोडण्यातही आली आहेत. तर काही ग्राहकांनी शासकीय सुट्टी असतानाही धावपळ करत पैशांची जुळवाजुळव करून बिले भरण्यात धन्यता मानली. मात्र ज्यांची पैशांची जुळणी झाली नाही अश्या अनेक ग्राहकांच्या घरात काळोख पसरला. अनेक ठिकाणी थकबाकीदार ग्राहक व वायरमन यांच्यात चांगलीच खडाजंगीही उडाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









