डॉ. छाया महाजन यांचे प्रतिपादन
पणजीः/ वार्ताहर
वर्षोनुवर्षे स्त्रियांना व्यक्त व्हायला स संधी मिळाली नाही तेव्हा स्त्रियांनी व्यक्त व्हायला हवं. स्त्रियांवर पुरुषांनी लिहिलं आहे परंतु त्यांनी स्त्रियांची मानसिकता,भावनिकता लिहिणे व महिलांनी स्वतः लिहिणे यात फरक आहे असे स्पष्ट करून,प्रसिद्ध साहित्यकि डॉ.छाया महाजन यांनी स्त्रिलेखिकांना मुख्य प्रवाहात आण्याची व त्यांच्या लेखनाची समीक्षा होण्याची गरज प्रतिपादिली.
गोवा मराठी अकादमीचे ’माझी माय सरसोती’ हे महिला साहित्य संमेलन रविवारी येथील आयएमबीच्या सभागृहात पार पडले त्यावेळी प्रमुख पाहुण्या यानात्याने डॉ. छोया महाजन
बोलत होत्या. त्यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत व कार्यकारी सदस्या तथा संमेलनाच्या
संयोजन प्रमुख पौर्णिमा केरकर उपस्थित होत्या.प्राचार्य सामंत म्हणाले, साहित्य हे भावना, संवेदना,कल्पनांना नवी ऊर्जा देते. दुसऱयाच्या अंतरंगाशी एकरूप झाल्याशिवाय चांगलं साहित्य निर्माण होत नाही.बहिणाबाईंचे उदाहरण देऊन त्यांनी दळले, भरडले गेल्यानंतरचं उत्तम लिखाण कसे होते हे स्पष्ट केले आणि अकादमीतर्फेगोमंतकीय लेखकांची यंदा 28 पुस्तके प्रकाशित होणार असल्याचे सांगितले तसेंच गोपाळकृष्ण भोबे यांच्यावरील ग्रंथ व बा. भ. बोरकर यांची पत्रे ही पुस्तकेही
प्रकाशित करण्यात येणार आहेत असे त्यांनी जाहीर केले.
पौर्णिमा केरकर यांनी प्रास्ताविक केले. दुसऱया सत्रात अंजली आमोणकर यांच्या अध्यक्षतेखाली ललितबंध या विषयावर परिसंवाद झाला. यांत मीना समुद्र, कालिका बापट, डॉ. रेवा दुभाषी व अपूर्वा ग्रामोपाध्ये यांनी ललित निबंध सादर करून निर्मिती मागची पार्श्वभूमी सांगितली. अंजली आमोणकर म्हणाल्या, कुठल्याही विषयाचे मुक्तचिंतन म्हणजे ललित साहित्य. यात भाषा शैली,आकर्षक शिर्षक व वाचकाला गुंतवून ठेवणारं लेखन याला महत्व असते.
काव्यगंध सत्रात स्वप्ना धुपकर, आरती दिनकर, आसावरी कुलकर्णी, आरती मोने, कविता आमोणकर,भक्ती सरदेसाई,गौरी भालचंद्र, दीपा मिरिंगकर,अनुया शिरोडकर, निलांगी शिंदे, सुनीता फडणीस,वर्षा मालवणकर,स्वरूपा शिकनिस,अंजली चितळे, शर्मिला प्रभू, उल्का काकडे, रेखा पौडवाल व श्वेता राऊत यांनी कविता सादर केल्या.
’लोकरंग’ कार्यक्रमाने केले प्रभावित
शेवटच्या सत्रात लोकगीतांमधून प्रतिबिंबित होणारे स्त्रियांचे भावविश्व निवेदन व कोकगीतांच्या माध्यमातून उलगडणारा लोकरंग हा कार्यक्रम सादर झाला व तो सर्वांना प्रभावित करून गेला. या कार्यक्रमाचे लेखन
व संकल्पना लोकगीतांच्या अभ्यासक
पौर्णिमा केरकर यांची होती.निवेदनाची बाजू वोनिता वरक व गौतमी चोर्लेकर यांनी सांभाळली.पौर्णिमा म्हणाल्या,ही लोकगीतं रचणाऱया महिला कुठल्याही शाळा, विद्यापीठात गेलेल्या नव्हत्या. सांसारिक जीवन जगताना कष्टाने ही उर्मी दिली. धिल्लो डोंगरावर कसा खेळला जातो
व त्याचे वैशिष्टय़ त्यांनी कथन केले.
संमेलनात सूत्रसंचालनाची बाजू श्रेया फडते, स्मिता गाड,वर्षा मालवणकर,स्नेहा सुतार यांनी केले.अधून मधून दिव्या बर्वे यांनी औचित्यपूर्ण गीते सादर करून रंगत आणली.









