आवळी बुद्रुक / प्रतिनिधी
शासनाने ग्रामीण भागामध्ये कर्जमाफी व पीक कर्ज योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राधानगरी शाखेतील कृषी अधिकारी पद रिक्तच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे या बँकेत कृषी अधिकाऱ्याची नेमणूक होणार कधी, असा सवाल होत आहे.
या बँकेत कृषी अधिकारी पद रिक्तच असल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून या योजनांचा तालुक्यामध्ये बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. या बँकेत ग्रामीण भागातील शेतकरी रोज येतात. मात्र कृषी अधिकारीच नसल्याने त्यांची कामे रखडली आहेत. विविध योजनांचा लाभ घेता नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने याची ताबडतोब दखल घेऊन हे पद तत्काळ भरावे, अन्यथा बँकेच्या शाखेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप कांबळे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे दिला.
याबाबत बँकेच्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता, वित्त विभागाचे मुख्य प्रबंधक संजय साळवी यांनी लॉकडाउनमुळे कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती रखडली आहे. परंतु सोमवारनंतर या अधिकाऱ्याची नियुक्ती करून साचलेल्या सर्व कामांचा निपटारा करण्यात येईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








