बाजारमूल्य 3.64 लाख कोटी रुपयांमध्ये – समभाग मजबूत स्थितीत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेची(एसबीआय) ओळख आहे. बँकेने आपली मजबूत कामगिरी करत बाजारमूल्यात पहिल्या दहामध्ये स्थान प्राप्त केले आहे. यासोबत शुक्रवारी सकाळी एसबीआयचे बाजारमूल्य 3.64 लाख कोटी रुपयाच्या घरात पोहोचले होते. याच मदतीने टॉप दहामध्ये एसबीआयने प्रवेश केला आहे. तर दुसऱया बाजूला 10 व्या स्थानी कार्यरत असणारा एअरटेल मात्र 11 व्या नंबरवर पोहोचला असून त्याचे बाजारमूल्य 3.17 लाख कोटीवर आहे. तर बजाज फायनान्सचे बाजारमूल्य 3.31 लाख कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद आहे.
एसबीआयच्या समभागातील स्थिती बदलत असल्याने दमदार कामगिरी केली जात आहे. यामध्येच तिमाही अहवाल सकारात्मक आल्यामुळे बँकेला जवळपास 5 हजार कोटी रुपयाहून अधिकचा लाभ झाला होता. सदरची नफा कमाई ही 2019 च्या डिसेंबर तिमाहीपेक्षा कमी आहे. परंतु शुक्रवारी समभागांनी 15 टक्क्यांची उसळी घेतल्यानंतर समभागाचे मूल्य 408 रुपयावर पोहोचले होते.
मे मध्ये बँकेचे समभाग 149 वर
मे महिन्यात बँकेचे समभाग जवळपास 149 रुपयांवर राहिले होते. यावेळी बाजारमूल्य 1.33 लाख कोटी रुपये होते. तेव्हापासून आतापर्यंत समभाग 250 रुपयानी वाढला आहे. बाजारमूल्य 2.30 लाख कोटी रुपयानी वधारले होते. अभ्यासकांच्या माहितीनुसार सदरच्या समभागातून मजबूत परतावा मिळणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. याचा लाभ बँकेला होत असल्याची माहिती आहे.
रिलायन्स सर्वोच्च स्थानी
बाजारमूल्याच्या प्रवासात रिलायन्स इंडस्ट्रीज आजही सर्वोच्च स्थानावर आहे. याचे बाजारमूल्य 12.25 लाख कोटी रुपये होते. टीसीएसचे बाजारमूल्य 11.77 लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचे समभागही नवा विक्रम दररोज बनवत आहे. शुक्रवारी समभाग वाढून 1618 रुपयावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली होती.









