कोटक महिंद्रा बँकेला टाकणार मागे : मागील महिन्यात बँकेचे समभाग 50 टक्क्यांनी वाढले
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणाऱया भारतीय स्टेट बँकेचे समभाग येत्या काही कालावधीत मजबूत स्थिती प्राप्त करण्याचे संकेत आहेत. सध्याच्या कालावधीत बँकेचे समभाग 422 रुपयांवर ट्रेडिंग करत असून लवकरच हा टप्पा 600 वर पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजारमूल्याच्या स्पर्धेत कोटक महिंद्रा बँकेला लवकरच स्टेट बँक मागे टाकणार असल्याचे संकेत आहेत. कारण मागील एक महिन्यापासून स्टेट बँकेचे समभाग जवळपास 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत.
साधारणपणे मार्च 2020 पासून आतापर्यंत बँकेचे समभाग जवळपास अडीज पटीने अधिकने कार्यरत राहिले आहेत. मॉर्गन स्टॅनले यांच्या एका अहवालानुसार एसबीआयचे समभाग हे 600 रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज नेंदवला आहे. देशातील आर्थिक स्थितीत सुधारणांमुळे असे होणे शक्य होणार आहे. गुरुवारी बँकेचे बाजारमूल्य 3.75 लाख कोटी रुपये झाले आहे. पहिल्या 10 मध्ये ही तिसरी बँक असल्याची माहिती आहे. प्रथम स्थानी एचडीएफसी बँक, दुसऱया स्थानी कोटक महिंद्रा बँक असून 10 हजार कोटीने मागे राहत स्टेट बँक तिसऱया स्थानी आहे.
एसबीआय सर्वात मजबूत?
मॉर्गन स्टॅनले यांनी दिलेल्या अहवालानुसार अन्य बँकांच्या तुलनेत स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मजबूत स्थिती प्राप्त करण्याचे संकेत आहेत. सोबत सरकारी कंपन्यांच्या तुलनेतही बँकेची कामगिरी चांगल्या स्थितीत आहे.
बँकेचे ध्येय डिजिटलायझेशन
स्टेट बँक आपल्या संपूर्ण कामगिरीत बदल करत असताना बदलत्या कालावधीसोबत सर्व व्यवहारांमध्ये डिजिटल प्रणाली आणण्यासाठीचे ध्येय निश्चित करत आहे. जागतिक पातळीवर अशी स्थिती चायना मर्चंट बँकेची आहे.









